www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईकरांना त्यांची आवडती `मोनो` रेल्वे सेवा आता १४ तास मिळणार आहे. उन्हाळ्यांच्या सुटीत पर्यटकांचा प्रतिसाद वाढणार असल्याने मोनो रेल्वेची ही सेवा सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत सुरु करण्यात येणार आहे असे, एमएमआरडीए सुत्रांकडून समजतंय.
वडाळा ते चेंबुर यामार्गावर २ फेब्रुवारीपासून मोनो रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झालीय. मात्र वेळेच्या अभावाने मोनोकडे प्रवाशांनी मोनोकडे पाठ फिरवली. गेल्या काही महिन्यात फक्त सहा लाख प्रवाशांनीच मोनोने प्रवास केला. त्यामुळे प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन मोनोरेल्वेची सेवा वाढवण्यात येणार आहे.
१५ एप्रिलपासून मोनोची १४ तासाची सेवा मुंबईकरांना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. त्यामध्ये दररोज जवळपास ११२ फेऱ्या होतील. ही तारीख मागे-पुढे होऊ शकते असे, महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान सांनी सांगितलंय. सध्या मोनो सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु असून, मोनो रेल्वेच्या १५-१५ मिनिटांनी फेऱ्या चालू आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.