...ही असतील भुयारी 'मेट्रो-३'ची २७ स्टेशन्स!

मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज... मुंबईतला महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा भुयारी 'मेट्रो-३'चं काम वेळेत म्हणजेच २०२० पर्यंत पूर्ण होईल, असा दावा 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड'नं (एमएमआरसीएल) केलाय. 

Updated: Feb 13, 2015, 10:17 AM IST
...ही असतील भुयारी 'मेट्रो-३'ची २७ स्टेशन्स! title=

मुंबई : मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज... मुंबईतला महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा भुयारी 'मेट्रो-३'चं काम वेळेत म्हणजेच २०२० पर्यंत पूर्ण होईल, असा दावा 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड'नं (एमएमआरसीएल) केलाय. 

'एमएमआरसीएल'नं आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत मेट्रो - ३ चं स्वरूप स्पष्ट केलंय. प्रकल्पाचं काम सुरु होण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यात. २०१५-१६ या आर्थिक वर्षात कामाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर मुंबईकरांच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या घोषणाही करण्यात आल्यात.

योग्य पुनर्वसनाची सोय झाल्याशिवाय गिरगाव - काळबादेवी भागातल्या अधिकृत इमारतींमधल्या रहिवाशांना विस्थापित करणार नाही, तसंच वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय आरेमधली झाडे तोडली जाणार नसल्याचं एमएमआरसीएलनं स्पष्ट केलंय. 

मेट्रो - ३ हा ३३.५ किलोमीटर लांबीचा मार्ग असून यावर २७ मेट्रो स्टेशन्स असणार आहेत. 

मेट्रो-३ मध्ये कुठली स्टेशन्स असतील... त्यावर टाकुयात एक नजर 

  1. कफ परेड 

  2. विधानभवन

  3. चर्चगेट

  4. हुतात्मा चौक (फ्लोरा फाऊंटन)

  5. मुंबई सीएसटी 

  6. काळबादेवी

  7. गिरगाव

  8. ग्रँट रोड

  9. मुंबई सेंट्रल

  10. महालक्ष्मी मेट्रो

  11. नेहरु सायन्स सेन्टर

  12. आचार्य अत्रे चौक

  13. वरळी

  14. सिद्धिविनायक मंदिर

  15. दादर मेट्रो

  16. शितलादेवी मंदिर

  17. धारावी

  18. बीकेसी मेट्रो

  19. विद्यानगरी

  20. सांताक्रूझ

  21. सीएसए डोमेस्टिक (टी-१)

  22. सहार रोड

  23. सीएसए इंटरनॅशनल (टी-२)

  24. आरे दूध कॉलनी

  25. मरोळ नाका

  26. एमआयडीसी

  27. अंधेरी (सिप्झ)

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.