रेल्वे समस्या : पाठवा प्रतिक्रिया, फोटो आणि ब्लॉग

मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर तुम्हाला फेस कराव्या लागलेल्या समस्या. काही अडचणी तसेच तुम्ही काढलेले फोटो. तुम्हाला आलेला अनुभव. तुम्ही रेल्वे समस्यांवर लिहिलेला ब्लॉग असेल. तर तो आम्हाला पाठवा. आम्ही निवडक फोटो, प्रतिक्रिया, ब्लॉग प्रसिद्ध करू.

Updated: Jan 2, 2013, 02:31 PM IST

www.24taas.com,मुंबई
मुंबईची लोकल ट्रेन. मुंबईची लाईफलाईन. मात्र, काहीवेळा मेगाब्लॉग तर अनेकवेळा भोंगळ कारभारामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागतो. गेले चार दिवस मुंबईकर प्रवाशांना आणि नोकरदार वर्गाला विस्कळीत मध्य रेल्वेसेवचा फटका बसत आहे. नोरकदार वर्गाला ऑफिसमध्ये पोहोचण्यास उशीर होत असल्याने बॉसचे बोलने खावे लागते शिवाय लेटमार्कचा शेरा. लेटमार्कचा शेरा बसल्याने खासगी नोकरदार वर्गाच्या पगारावर बालंट येत आहे.
रोज ‘मरे’ त्याला कोण रडे, अशी म्हण प्रवाशांमध्ये नेहमी ऐकायला मिळते. आता रोज `मरे` प्रवासी रडे, अशी नवी म्हण तयार झाली आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पात मुंबई रेल्वेच्या सोयी-सुविधांसाठी तरतूद करण्यात हात आखडता घेतला जातो. दिवसा गणिक वाढणारी गर्दी यामुळे रेल्वेवर ताण येत आहे. असे असताना रेल्वेचा खेळखंडोबा. कधी ओव्हरहेड वायर तुटणे तर कधी मेगाब्लॉगचा त्रास. अचानक सिग्नल यंत्रणा कोलमडने तर कधी मालगाडीचा डबा घसरणे. यातच योग्य त्या सूचना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत नाहीत. याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो.
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर तुम्हाला फेस कराव्या लागलेल्या समस्या. काही अडचणी तसेच तुम्ही काढलेले फोटो. तुम्हाला आलेला अनुभव. तुम्ही रेल्वे समस्यांवर लिहिलेला ब्लॉग असेल. तर तो आम्हाला पाठवा. आम्ही निवडक फोटो, प्रतिक्रिया, ब्लॉग प्रसिद्ध करू. चला मग, पाठवा झटपट प्रतिक्रिया, फोटो आणि ब्लॉग.

प्रतिक्रिया द्या-
खालील विंडोमध्ये टाईप करा.
नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया:
पाठवा फोटो -
आमचा ई-मेल आयडी-
zee24taasonline@gmail.com