मध्य रेल्वे २५ मिनिटे लेट, सिग्नल यंत्रणेत बिघाड

मध्य रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. सिग्नल बिघाडानंतर मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत आहे.

Updated: Feb 27, 2015, 08:29 AM IST
मध्य रेल्वे २५ मिनिटे लेट, सिग्नल यंत्रणेत बिघाड title=

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. सिग्नल बिघाडानंतर मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत आहे.

 गुरुवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. मात्र रात्रीच्या बिघाडानंतर आज सकाळीही मध्य रेल्वेची वाहतूक २०  ते २५ मिनिटाने उशिरा सुरु आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना याचा  फटका बसत आहे. 
 
दरम्यान, कल्याण-ठाकुर्ली दरम्यान सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्तीचे काम सुरुच होते. सिग्नल दुरुस्तीचे अजुनही न झाल्याने मध्य मार्गावरील वाहतूक २५ मिनिटे लेट आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.