आता, भ्रष्टाचाराची तक्रार करा एका क्लिकवर...

आता मोबाईलच्या एका क्लिकवर भ्रष्टाचारा विरोधात तुम्ही तक्रार करु शकता. कारण महाराष्ट्र लाचलूचपत विभागाने एक 'वेब अॅप' लॉन्च केलंय. 

Updated: Feb 26, 2015, 10:32 PM IST
आता, भ्रष्टाचाराची तक्रार करा एका क्लिकवर...  title=

मुंबई : आता मोबाईलच्या एका क्लिकवर भ्रष्टाचारा विरोधात तुम्ही तक्रार करु शकता. कारण महाराष्ट्र लाचलूचपत विभागाने एक 'वेब अॅप' लॉन्च केलंय. 

acbmaharashtra.net (एसीबी महाराष्ट्र डॉट नेट)  असं या वेब ऍपचं नाव आहे.  या वेब अॅपवर तुम्ही तुमची कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची तक्रार नोंदवू शकता, अशी माहिती लाचलुचपत विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिलीय. 

यामध्ये, तक्रारकर्त्याला स्वत:च नाव, मोबाईल क्रमांक नोंदवावं लागेल... तसंच ज्या व्यक्तीविरोधात तक्रार करायचीय त्या व्यक्तीचं नाव, पद आणि भ्रष्टाचाराचं स्वरुप नोंदवावं लागेल. तुमच्याकडे व्हिडिओ, ऑडिओ किंवा आणखी काही पुरावा असेल तोही तुम्ही इथं अपलोड करू शकता.

याच अॅपविषयी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी केलेली ही बातचीत....

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.