मुंबईकरांनो, तुमच्यासाठीच आहे ही खुशखबर!

पुढील पाच वर्षांत म्हणजे २०१९-२० पर्यंत एक लाख ९ हजार २९८ घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणी राज्य सरकारनं केलीय. 

Updated: Jul 22, 2015, 11:49 PM IST
मुंबईकरांनो, तुमच्यासाठीच आहे ही खुशखबर! title=

मुंबई : पुढील पाच वर्षांत म्हणजे २०१९-२० पर्यंत एक लाख ९ हजार २९८ घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणी राज्य सरकारनं केलीय. प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नावर सरकारनं लेखी उत्तरात ही माहिती दिलीय. 

मुंबईकरांसाठी आणखीही एक गुड न्यूजच म्हणावी लागणार आहे. लाखो मुंबईकरांना मालमत्ता करात सूट मिळणार आहे. 
 
५०० चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या घरांना मालमत्ता करातून सूट मिळणार आहे. त्याबाबतचे मुंबई महापालिका सुधारणा विधेयक आज विधानसभेत संमत झालं.

या विधेयकामुळं मुंबईतल्या सुमारे ११ लाख घरांना मालमत्ता करात सूट मिळणार आहे. यंदाच्या वर्षी मुंबई महापालिकेनं मालमत्ता करात सुमारे ४० टक्के वाढ केली होती. मात्र, आता त्यातून ५०० चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या घरांना पूर्ण करमाफी देण्यात आलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.