नवी मुंबई: जेव्हा शाळेतील विद्यार्थिनी आपल्या शिक्षिकेला पत्र देते तेव्हा ते सुट्टी असेल, असंच आपण गृहित धरतो. पण वाशीमध्ये एक अशी घटना घडलीय, ज्यामुळं आपल्याला धक्का बसेल.
वाशीतील एका शाळेच्या १३ वर्षीय विद्यार्थिनीनं आपल्या शिक्षिकेला पत्र लिहून तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. या पत्रात लिहिलं होतं की, तिचे वडील तिच्यावर बलात्कार करतात आणि आई ते पाहत राहते, तिची मदत करत नाही.
घटनेनंतर शिक्षिकेनं स्थानिक एनजीओला संपर्क केला. त्यांच्या मदतीनं विद्यार्थिनीनं आपल्या आई-वडिलांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवलीय.
सातव्या वर्गात शिकणारी १३ वर्षीय मुलीनं आपल्या शिक्षिकेला गेल्या आठवड्यात पत्र लिहिलं होतं. तिच्यावरच नाही तर तिच्या मोठ्या बहिणीवरही वडील बलात्कार करत असल्याचं लिहिलं होतं.
पोलिसांनुसार मुलीचे वडील एक फळविक्रेता आहे. मुलीनं पोलिसांसमोर सांगितलं, 'माझे वडील आईसमोर माझ्यावर बलात्कार करतात. त्यानंतर आई मला एक गोळी खायला देते. मी सात वर्षांची असतांनापासून वडील माझ्यावर बलात्कार करतात.'
आता पोलीस हे तपास करत आहेत की, ती गोळी प्रेग्नेंसी थांबविण्याची आहे का? पीडित मुलीची मोठी बहिण, मोठा भाऊ आणि दोन लहान भाऊ आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत तिच्यावर बलात्कार व्हायचा. पोलिसांच्या मते पीडित मुलीची मोठी बहिण घरी राहत नाही, पण ती सुद्धा वडिलांच्या शोषणाची बळी आहे.
काऊंसिलिंगनंतर मिळाली हिंमत
विद्यार्थिनीनं आपल्यावरील अत्याचाराबद्दल बोलण्याचं साहस शाळेत झालेल्या काऊंसिलिंगनंतर केली. मुलीला आता एनजीओद्वारे चालवल्या जाणाऱ्या बालकेंद्रात ठेवलंय. तिच्या आई-वडिलांविरोधात कलम ३७६, पोस्को अॅक्टचे सेक्शन ५ (L) (N)अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.