भूसंपादन विधेयकावरून मुख्यमंत्र्यांची शिवसेनेला कोपरखळी

भूसंपादन विधेयकावरून राज्यात भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे. ज्यांना भूसंपादन विधेयकातील मुद्दे समजले नाहीत, त्यांना समजावू, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Updated: Feb 25, 2015, 06:52 PM IST
भूसंपादन विधेयकावरून मुख्यमंत्र्यांची शिवसेनेला कोपरखळी title=

मुंबई : भूसंपादन विधेयकावरून राज्यात भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे. ज्यांना भूसंपादन विधेयकातील मुद्दे समजले नाहीत, त्यांना समजावू, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

तर शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी भाजपावर पलटवार करतांना म्हटलंय, शिवसेनेचा भूसंपादन विधेयकातील दुरूस्तीला विरोध असेलच, यापुढे कोणताही महत्वाचा निर्णय घेतांना शिवसेनेला विश्वासात घेणे गरजेचे असल्याचंही सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.