www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
येत्या १२ तारखेला मनसेचं टोलविरोधात रास्तारोको आंदोलन आहे. या आंदोलनात टोल नाक्याचे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचे १२ वाजू नयेत, म्हणून पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड होण्याची दाट शक्यता आहे.
कारण उस्मानाबादेत मनसे कार्यकर्त्यांना १२ तारखेच्या पार्श्वभूमीवर नोटीसा देण्यात आल्या आहेत.
मनसेच्या यापूर्वीच्या आंदोलनात ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आक्रमक, पण पोलिसांना डोकेदुखीची भूमिका पार पाडली आहे.
नेतृत्व करणारे, आक्रमक कार्यकर्ते बाहेर राहून उपद्रवी ठरतील, म्हणून त्यांना दोन दिवस आत ठेवण्याची काळजी घेतली जाते. या कार्यकर्त्यांना दोन दिवस एकाच जागी बसवून ठेवणं पोलिसांना परवडतं.
दोन दिवस मनसे कार्यकर्त्यांना डांबून पोलिसांकडून शांतता ठेवण्याचा प्रयत्न होत असतो.
मात्र मनसे कार्यकर्त्यांना हा अनुभव आता नवीन नाही, म्हणून पोलिसांनी घर गाठण्याआधीच, कार्यकर्त्यांची पांगापांग सुरू झाली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.