मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक उडाली. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. काही वेळ सभागृहाचे कामकाज थांबविण्यात आले.
मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि भाजपच्या नगरसेविका ज्योती अळवणी यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. मात्र, दोघांनीही एकमेकांविरोधात जोरदार हरकत घेतली. पालिका सभागृहात वातावरण गरम होते. गोंधळ निर्माण झाल्याने सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
नवऱ्याच्या जीवावर निवडून आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, असे टोला मनसेचे संदीप देशपांडे यांनी भाजपच्या ज्योती अळवणी यांना टोला लगावला. त्यामुळे संदीप देशपांडे आणि ज्योती अळवणी यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे सभेत गोंधळ निर्माण झाला. देशपांडे यांनी माफी मागवी अशी मागणी भाजपने केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.