मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पाअंतर्गत मार्गात येणाऱ्या झाडांची तोड करण्यास राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे. याचा राग आरे कॉलनीत मेट्रो-३ कारशेड ऑफिसची तोडफोड करत काढला.
आरे कॉलनीतील झाडे तोडल्याच्या संतापातून मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो-३ कारशेड ऑफिसची तोडफोड करत संतापाला वाट करुन दिली. मनसेचे पुन्हा खळ्ळ फट्याक केले.
कालच राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले होते. मुंबई मेट्रो प्रकल्प होणार नाही, आरे तोडू देणार नाही, आणि हा राजकीय विषय नाही, हा मराठी माणसाचा अस्तित्वाचा विषय आहे, मुंबई ही मराठी माणसाची आहे. ती आपल्याला टिकवावी लागेल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी हा हल्ला चढवला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.