अमेरिकन महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्या 'त्या' तरुणाला अखेर अटक

अमेरिकन महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्या त्या तरुणाला अखेर कुलाबा पोलिसांनी अटक केलीय. गोपाळ वाल्मिकी असं आरोपीचं नाव आहे. त्याच्या घरी जावून पोलिसांनी त्याला अटक केली.

Updated: Aug 19, 2015, 04:10 PM IST
अमेरिकन महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्या 'त्या' तरुणाला अखेर अटक title=

मुंबई: अमेरिकन महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्या त्या तरुणाला अखेर कुलाबा पोलिसांनी अटक केलीय. गोपाळ वाल्मिकी असं आरोपीचं नाव आहे. त्याच्या घरी जावून पोलिसांनी त्याला अटक केली.

मुंबईतील कुलाबा परिसरात सोमवारी सकाळी मर्यान्ना एबडो ही अमेरिकन महिला मॉर्निंग वॉकला गेली असतांना या आरोपीनं महिलेसमोर हस्तमैथुन करू लागला. महिलेनं त्याचे फोटो ट्विटरवर टाकून ही पोस्ट रिट्विट करण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आणि आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले. 

हे फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी तो व्यक्ती कुठे राहतो हे सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. आरोपी गोपाळला आज दुपारी १२ नंतर कोर्टात हजर करणार असून त्याला पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.