मुंबई : जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. गणपतीआधी रस्ते दुरुस्त करा, अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती.
तरीही झोपेचं सोंग घेतलेल्या भाजप-शिवसेना सरकारला अद्याप जाग आलेली नाही. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था पाहता चाकरमानी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेद्वारे कोकणात जाणार आहेत. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोल फ्री करण्यात यावा, अशी मागणी नितेश राणे शासनाकडे करणार आहेत.
सरकारने आपली जबाबदारी ओळखून गणपतीसाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोल फ्री करावा. आमची मागणी सरकारने मान्य केली तर ठीक. अन्यथा कोकणी माणसांच्या हक्कांसाठी, भल्यासाठी आम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.