तीन दिवसात रेल्वे अपघातात ३९ बळी

मुंबईत सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत रेल्वेच्या वेगवेगळ्या अपघातात 39 जणांचा बळी गेलाय. तर एकूण 32 जण जखमी झालेत. 

Updated: Nov 20, 2015, 09:09 PM IST
तीन दिवसात रेल्वे अपघातात ३९ बळी  title=

मुंबई : मुंबईत सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत रेल्वेच्या वेगवेगळ्या अपघातात 39 जणांचा बळी गेलाय. तर एकूण 32 जण जखमी झालेत. 

यातले बहुतांश मृत्यू हे लोकल ट्रेनमधील अतोनात गर्दीमुळं झालेत. तर त्याखालोखाल रेल्वे ट्रॅक ओलांडताना प्रवाशांचे बळी गेलेत. 

बुधवारी रेल्वे पोलिसांनी 12 अपघाती मृत्युंची नोंद केलीय. यात तीन महिलांचा समावेश होता. रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी किमान 50 टक्के लोकांची ओळखच पटत नसल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिलीय. 

मुंबईत ट्रॅक ओलांडताना होणा-या मृत्युंपैकी 60 टक्क्यांहून जास्त मृत्यू हे एकट्या मध्य रेल्वेवर होत असल्याचं आकडेवारीतून पुढं येतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.