गेल्या २४ तासांत स्वाईन फ्लचे १२ बळी

गेल्या 24 तासांत स्वाईन फ्लूनं आणखी 12 जणांचा बळी घेतलाय... राज्यात मृतांचा आकडा 247 झालाय. कालच्या दिवसात आणखी 114 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांचा आकडाही 3 हजारांच्या घरात गेलाय.

Updated: Mar 12, 2015, 08:45 PM IST
गेल्या २४ तासांत स्वाईन फ्लचे १२ बळी title=

मुंबई : गेल्या 24 तासांत स्वाईन फ्लूनं आणखी 12 जणांचा बळी घेतलाय... राज्यात मृतांचा आकडा 247 झालाय. कालच्या दिवसात आणखी 114 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांचा आकडाही 3 हजारांच्या घरात गेलाय.

मुंबईत स्वाईन फ्लूनं आतापर्यंत 24 जणांचा बळी घेतलाय. तापमानात वाढ होत असतानाही स्वाईन फ्लूचा विळखा अद्याप सुटताना दिसत नाहीये. त्यात पुन्हा अवकाळी पावसानं काही भागात ठाण मांडलंय. अशा स्थितीत आगामी काळात या रोगाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती आहे... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.