अपघातग्रस्त 'आयएनएस बेटवा' तीन महिने सेवेबाहेर

नौदलाची युद्धनौका 'आयएनएस बेटवा' या युद्धनौकेचे मुंबईच्या नौदल गोदीमध्ये झालेल्या अपघातामध्ये मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पुढील काही महीने ही युद्धनौका सेवेबाहेर रहाणार आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश नौदलाने दिले आहेत.

Updated: Dec 6, 2016, 10:01 AM IST
अपघातग्रस्त 'आयएनएस बेटवा' तीन महिने सेवेबाहेर title=

अमित जोशी, मुंबई : नौदलाची युद्धनौका 'आयएनएस बेटवा' या युद्धनौकेचे मुंबईच्या नौदल गोदीमध्ये झालेल्या अपघातामध्ये मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पुढील काही महीने ही युद्धनौका सेवेबाहेर रहाणार आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश नौदलाने दिले आहेत.

'ब्रम्हपुत्रा' वर्गातील दुसरी युद्धनौका म्हणून 'आयएनएस बेटवा'ची ओळख आहे. सुमारे दोन महिने मुंबईच्या नौदलाच्या गोदीत बेटवाची डागडुजी पूर्ण झाली. सोमवारी युद्धनौकेला गोदीमधून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु असताना बेटवा ज्या आधारावर गोदीमध्ये उभी होती तो भाग ढासळल्याने बेटवा एका बाजूला पूर्णपणे कलंडली. 

या अपघातामध्ये युद्धनौकेचे नुकसान झालेच पण दोन नौसैनिक ठार झाले तर 14 जण जखमी झाले. या अपघाताच्या चौकशीचे आदेश नौदलाने दिले आहेत. आता कलंडलेली युद्धनौका उभी करण्याचे मोठे आव्हान नौदलासमोर आहे. एक महत्त्वाच्या ताज्या दमाच्या युद्धनौकेचे नुकसान झाले असल्याने नौदलाला धक्का मानला जात आहे.

'आयएनएस बेटवा'

- 'आयएनएस बेटवा'ची बांधणी कोलकताच्या गार्डन शिपयार्ड गोदीत झाली

- 3850 टन वजन, हवेत लक्ष्याचा वेध घेणारी बराक क्षेपणास्त्र प्रणाली

- युद्धनौका विरोधी क्षेपणास्त्र 'उरण'

- 2006 च्या लेबनॉन - इस्राइल युद्धात अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यात महत्त्वाची भूमिका

2011 ते 2014 दरम्यान भारतीय नौदलात विविध युद्धनौका, पाणबुडी यांना अपघातांना सामोरे जावे लागले होते. हे अपघाताचे सत्र आत्ता कुठं थांबलं असताना पुन्हा एकदा नौदलाच्या महत्त्वाच्या युद्धनौकेला अपघाताला सामोरं जावं लागलंय.

या युद्धनौकेचे नक्की किती नुकसान झालं हे युद्धनौका पूर्ववत केल्यावर स्पष्ट होईल. असं असलं तरी युद्धनौका काही महिने सेवेबाहर राहाणार, हे निश्चित...