डॉ. आंबेडकरचं परळ येथील निवासस्थान ठरतंय अनेकांस्थाठी प्रेरणास्थान

  6 डिसेंबर अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. मुंबईत बाबासाहेब आंबेडकरांनी परळमधल्या ज्या वास्तूत तब्बल 22 वर्ष वास्तव्य केलं होतं, त्या स्थळाला झी 24 तासनं भेट दिली. त्यावरचाच हा विशेष वृत्तांत.

Updated: Dec 6, 2016, 07:27 AM IST
डॉ. आंबेडकरचं परळ येथील निवासस्थान ठरतंय अनेकांस्थाठी प्रेरणास्थान title=

मुंबई :  6 डिसेंबर अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. मुंबईत बाबासाहेब आंबेडकरांनी परळमधल्या ज्या वास्तूत तब्बल 22 वर्ष वास्तव्य केलं होतं, त्या स्थळाला झी 24 तासनं भेट दिली. त्यावरचाच हा विशेष वृत्तांत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद:स्पर्शाने पावन झालेली परेल इथल्या बी. आय. टी. चाळ क्रमांक एक मधील खोली क्रमांक 50 आणि 51. डॉ. आंबेडकरांनी 1912 आणि 1934 मध्ये वास्तव्य केलं होतं. डॉ. आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील महत्वाचा काळ या निवासस्थानी व्यतीत केला होता. त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घटनांची साक्ष हे घर देतं. आता या ठिकाणी त्यांचे अनुयायी वास्तव्य करतात. 

काळाच्या ओघात ही वास्तू आता पूर्वीसारखी राहिली नाही. मात्र, महामानवाने आपल्या आयुष्यातील महत्वाचा काळ इथं घालवल्यामुळं ही वास्तू आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरते आहे.

पाहा व्हिडिओ