कोस्टल रोडवरून शिवसेना-भाजपात श्रेय्याची लढाई

मुंबईतल्या कोस्टल रोडच्या श्रेय्यावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेय्याची लढाई सुरू असतानाच भाजपनं आपल्या मित्रपक्षाची खोडी काढली आहे. 

Updated: Jun 10, 2015, 02:47 PM IST
कोस्टल रोडवरून शिवसेना-भाजपात श्रेय्याची लढाई title=

मुंबई : मुंबईतल्या कोस्टल रोडच्या श्रेय्यावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेय्याची लढाई सुरू असतानाच भाजपनं आपल्या मित्रपक्षाची खोडी काढली आहे. 

कोस्टल रोडचा विषय मार्गी लावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स मुंबईत झळकत आहेत. 

मुंबई भाजपा अध्यक्ष अशिष शेलार यांनी ही पोस्टर्स लावली आहेत. मात्र, या पोस्टर्समध्ये शिवसेनेचा उल्लेखही टाळण्यात आलाय. कोस्टल रोडचं संपूर्ण श्रेय भाजपाकडे घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं दिसतोय. 

सामनात काय म्हटलेय?

नरीमन पॉइंट ते कांदिवली असा ३५ किलोमीटरचा नवा सागरी किनारा मार्ग मुंबईकरांना मिळेल. या प्रकल्पाची घोषणा शिवसेनेने केली होती. आमची बांधिलकी जनतेशी आहे. चांगले काम करावे आणि जनताजनार्दनाच्या चरणी ती कार्यपुष्पे अर्पण करून पुढच्या कामास हात घालावा हेच आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी शिकवले आहे. त्यामुळे कोस्टल रोड पूर्ण व्हावा व जनतेच्या चेहर्‍यावर फुललेले हसू पाहावे हेच आमचे श्रेय आहे. ते आम्ही नक्कीच घेऊ.

मुंबईकरांच्या सुखासाठी करण्याचा प्रयत्न केला व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या कामाची घोषणा केली. राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचे राज्य असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होते. हा प्रकल्प त्यावेळी वेळेत तडीस नेला, पण शिवसेनाप्रमुखांनी शाबासकी दिली तेव्हाचे सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांना. गडकरी यांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तेव्हा जीवाचे रान केले व शिवसेनाप्रमुखांनी त्या मेहनतीचे विस्मरण होऊ दिले नाही. त्यामुळे या सागरी किनारा मार्गाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना व भाजपात चढाओढ अजिबात नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.