HIV बाधित रूग्णांचे रक्त डोळ्यात उडालं, काय होणार?

शासकिय रूग्णालायत नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींना डॉक्टर आणि पारिचारिकांना सामोरे जावे लागते. अशीच काहीशी विचित्र घटना मुंबईतील केईएम रूग्णालयात घडली आहे.

Updated: Oct 16, 2012, 01:26 PM IST

www.24taas.com, मुंबई
शासकिय रूग्णालायत नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींना डॉक्टर आणि पारिचारिकांना सामोरे जावे लागते. अशीच काहीशी विचित्र घटना मुंबईतील केईएम रूग्णालयात घडली आहे. सलाईनसाठी लावलेली सुई काढताना कावीळ आणि एचआयव्ही रुग्णांचे रक्त परिचारिका विद्यार्थिनींच्या डोळ्यात उडाल्याच्या दोन घटना गेल्या चार दिवसांत केईएम रुग्णालयात घडल्या.
आता आपल्यालाही त्या आजारांचा संसर्ग होईल अशी भीती या विद्यार्थिनींना वाटू लागली आहे. त्यांना वैद्यकीय चाचणी करावी लागली. त्यासाठी शेकडो रुपयांचा खर्च स्वतःच करावा लागला. प्रशासनाने काहीच मदत केली नाही.
केईएमच्या वॉर्ड २० मध्ये एका एचआयव्ही रुग्णाच्या हाताची सुई काढताना परिचारिका विद्यार्थिनीच्या डोळ्यात त्याचे रक्त उडाले.
सावधगिरी म्हणून तिला प्रतिबंधक औषधे देण्यात आल्याचे समजते. रुग्ण एचआयव्हीबाधित आहे याची कल्पना डॉक्टरांनी आपल्याला दिली नव्हती, अन्यथा काळजी घेतली असती असे या विद्यार्थिनीचे म्हणणे आहे. दुसरी घटना वॉर्ड ४ मध्ये घडली.