वर्धापनदिन सोहळ्यात राज ठाकरेंनी मांडलेले ठळक मुद्दे

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १०व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात राज ठाकरेंनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे

Updated: Mar 9, 2016, 09:49 PM IST
वर्धापनदिन सोहळ्यात राज ठाकरेंनी मांडलेले ठळक मुद्दे title=

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १०व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात राज ठाकरेंनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे

- प्रत्येकाच्या जीवनात बॅड पॅच येतो - राज ठाकरे 
- बॅड पॅचला घाबरू नका - राज ठाकरे 
- मला जे भरभरून बोलायचे ते गुढीपाडव्याच्या दिवशी बोलणार आहे. 
- मी ८ तारखेला बोलणार आहे -  राज ठाकरे 
- यापुढे इंजिनचं चाक अडणार नाही - राज ठाकरे
- काय चाललं होतं, हे सांगायचे आहे आणि काय करायचं हे सांगणार आहे - राज ठाकरे
- काँग्रेसच्या राज्यात मनसेच्या आंदोलनामुळे ४० हजार खोट्या रिक्षा आणि टॅक्सी सापडल्या 
- लोकांसाठी आंदोलन करायला पाहिजे - राज ठाकरे 
- सरकार बदलून काही उपयोग नाही, तेच सुरू आहे - राज ठाकरे 
- न्याय द्यायचा न्यायाने द्या, वर्तमानपत्र आणि चॅनल बघून न्याय देऊ नका - राज ठाकरे 
- मराठी मुले आणि मुलींना रिक्षा-टॅक्सीचे परवाने द्या - राज ठाकरे 
- सरकार आहे, न्यायाधिशांनी चोमडेपणा करू नये - राज ठाकरे 
- विनाकारण होर्डिंग न लावणारा मनसे पहिला पक्ष - राज ठाकरे 
- न्यायाधिशांनी आपला आदर टीकवावा, विनाकारण नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये. 
- ७० हजार परवाने दिले जात आहे, त्यातील ७० टक्के परवाने परप्रांतीयांना - राज ठाकरे 
- १५ वर्षांच्या वास्तव्याचा दाखला तात्काळ देण्याची गरज नाही, सीआयडीने करून - 
- ७० हजार रिक्षा परवाने देण्याची घाई काय, मुख्यमंत्री साहेब - राज ठाकरे 
- राहुल बजाज यांच्या ७० हजार रिक्षा खपविण्यासाठी हा निर्णय - राज ठाकरे 
- ११९० कोटी रुपयांचा व्यवहार होणार, त्याचं किक बॅक किती असेल - राज ठाकरे 
- काय फरक आहे तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये - राज ठाकरे 
- या खात्याचे मंत्री शिवसेनेचे आहे - राज ठाकरे 
- मराठीचा पुळका कशासाठी  - राज ठाकरे 
- ७० हजार परवाने मराठी मुलं आणि मुलांना द्याला पाहिजे होते - राज ठाकरे 
- नवीन परवाने, नवीन नंबर प्लेट असलेल्या रिक्षा जाळायच्या - राज ठाकरे 
- मनसेमुळे १४ मराठी मुलांना लागली नोकरी - राज ठाकरे 
- नव्या रिक्षा जाळून टाका - राज ठाकरे 
- प्रवाशांना उतरवा आणि रिक्षा जाळा - राज ठाकरे 
- नव्या येणाऱ्या रिक्षा, मी सांगतो आहे, नाही तर बिल मागतो बिल  म्हणून जाळाल... - राज ठाकरे 
- आजोबांनी सांगितले होतं एक तर हात जोडून किंवा हात सोडून काम करायचे - राज ठाकरे  
- कुठे जायचं हे माहिती आहे, तुम्हांला तेथे घेऊन जाणार आहे - राज ठाकरे