मुंबई : 'कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकारी सापडले आहेत. मात्र, राज्य सरकार मुद्दाम आरोपींची नावं जाहीर करत नाहीत' असा सणसणाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी केलाय.
एसआयटीच्या आधिकाऱ्यांनीच या संदर्भात आपल्याला माहिती दिल्याचा दावा, हसन मुश्रीफ यांनी केलाय. मग, फडणवीस सरकार ही नावं जाहीर का करीत नाही? असा प्रश्नही मुश्रीफ यांनी केलाय.
16 फेब्रुवारी रोजी गोविंद पानसरे यांच्यावर मारेकऱ्यांनी हल्ला केला होता. त्यात गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांचा 20 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.