भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक, विरोधकांची बॅनरबाजी

एकीकडे दिल्लीत भाजप खासदारांचे निदर्शनं सुरू असतांना. विधानसभेतही विरोधकांनी बॅनर फडकावले. तर भाजप आमदारांनीही बॅनरबाजी केली. 

Updated: Jul 24, 2015, 10:50 AM IST
भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक, विरोधकांची बॅनरबाजी title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: एकीकडे दिल्लीत भाजप खासदारांचे निदर्शनं सुरू असतांना. विधानसभेतही विरोधकांनी बॅनर फडकावले. तर भाजप आमदारांनीही बॅनरबाजी केली. 

आज सकाळी विधानसभेचं कामकाज सुरू होताच भ्रष्टाचारी मंत्र्यांचा मुद्यावर विरोधक आक्रमक झाले. सुरूवातील विधानभवनाच्या पायऱ्यांवर आणि नंतर विधान भवनात बॅनरबाजी करण्यात आली. पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, रणजीत पाटील आणि विनोद तावडे यांच्याविरोधात विरोधक आक्रमक होत, या चारही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. 

राधाकृष्ण विखे पाटील स्थगन प्रस्ताव मांडत होते. यासंबंधात त्यांनी बॅनर आणले होते. बॅनर बाहेर न्या, सांगूनही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच होती. आज विधिमंडळात घोटाळ्याचे आरोप असलेल्या मंत्र्यांवर चर्चा व्हावी आणि मुख्यमंत्र्यांनी यावर निवेदन करावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. 

दरम्यान, विरोधकांच्या बॅनरबाजीला उत्तर देत भाजपा आमदारांचीही बॅनरबाजी केली. रमेश कदम यांना अटक करा असे बॅनर त्यांनी फडकावले. गोंधळात विधानसभेचं कामकाज २० मिनीटांसाठी तहकूब करण्यात आलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.