गुलाम अली भारतात 'घरवापसी'साठी येणार?

मुंबईत पुन्हा एकदा पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली येणार असल्याची शक्यता आहे. अलीकडेच झालेल्या वादानंतर गुलाम अली भारतात येण्याती शक्यता आहे. 'घरवापसी' या चित्रपटात अली यांनी देशभक्तिपर गीत गायिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक साहिब इलायसी आहेत. या गाण्याचे लाँचिग २९ जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे. यासाठी इलायसीने यांनी गुलाम अली निमंत्रण दिले आहे.

Updated: Jan 11, 2016, 06:27 PM IST
गुलाम अली भारतात 'घरवापसी'साठी येणार? title=

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली येणार असल्याची शक्यता आहे. अलीकडेच झालेल्या वादानंतर गुलाम अली भारतात येण्याती शक्यता आहे. 'घरवापसी' या चित्रपटात अली यांनी देशभक्तिपर गीत गायिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक साहिब इलायसी आहेत. या गाण्याचे लाँचिग २९ जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे. यासाठी इलायसीने यांनी गुलाम अली निमंत्रण दिले आहे.

काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेने प्रचंड विरोध केल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. तसेच अली यांनी आपले भारतातील सर्व कार्यक्रम पुढे ढकलले होते. 

'घरवापसी' या चित्रपटात अली यांनी 'अपनी मिट्टी की खुशबू है रगो में यह बसी है' हे गीत गायिले आहे. या चित्रपटात अलोकनाथ आणि फरिदा जलाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. या कार्यक्रमाला सुनिधी चौहान आणि सोनू निगम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष 
पाकिस्तानी कलाकारांना मुंबई बोलावून कार्यक्रम घेण्यास शिवसेनेचा पूर्वीपासूनच विरोध आहे. गेल्या वर्षी पत्रकार सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांना मुंबईतील कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले होते. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले होते. त्यानंतर गुलाम अली यांच्याही कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. आता अली यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.