मुंबई : नोकरीसाठी धडपडणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी बातमी कामाची... पुढील दोन वर्षात सरकारी नोकरी बँकांमध्ये ८० हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
पुढच्या दोन वर्षांत ८० हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्य़ांची पदं रिक्त होणार आहेत... चालू वर्षात ३९,७५६ सरकारी बँक कर्मचारी रिटायर होणार आहेत... तर पुढील वर्षी ३९ हजार सरकारी बँक कर्मचारी रिटायर होतायत. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागांवर भरती होणार आहे.
रिक्त होणाऱ्या या सगळ्या जागा तात्काळ भरण्यात येणार आहेत. त्यामुळं पुढील दोन वर्षांत सरकारी बँकांमध्ये नोकऱ्यांची लॉटरीच फुटणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.