अनुराधा कशेळकर आमच्या पदाधिकारी नाहीत, युवा सेनेचा दावा

इन्कम टॅक्सची अधिकारी असल्याचं सांगून एका व्यापाऱ्याला लुटणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. या महिलेचं नावं अनुराधा कशेळकर आहे. ती शिवसेनेच्या युवा सेनेची पदाधिकारी असल्याची माहिती पोलीसांनी दिली होती. मात्र, ही महिला कोणत्याही पदावर नव्हती. त्यांचा युवा सेनेशी काहीही संबंध नाही. त्या युवा सेनेच्या सक्रिय सदस्यदेखील नाही, असा खुलासा युवा सेनेकडून करण्यात आला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 22, 2013, 10:04 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इन्कम टॅक्सची अधिकारी असल्याचं सांगून एका व्यापाऱ्याला लुटणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. या महिलेचं नावं अनुराधा कशेळकर आहे. ती शिवसेनेच्या युवा सेनेची पदाधिकारी असल्याची माहिती पोलीसांनी दिली होती.
मात्र, ही महिला कोणत्याही पदावर नव्हती. त्यांचा युवा सेनेशी काहीही संबंध नाही. त्या युवा सेनेच्या सक्रिय सदस्यदेखील नाही, असा खुलासा युवा सेनेकडून करण्यात आला आहे.
अनुराधा कशेळकर ही महिला युवा सेनेची पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून आजपर्यंत वावरत होती. पण आता या महिलेचा खरा चेहरा समोर आलाय. अनुराधा सध्या डी. बी. मार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे. कारण आपण इन्कम टॅक्स विभागात असिस्टंट कमिशनर असल्याचं सांगून तिनं एका व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा घातलाय, अशी माहिती एसीपी अनंत जाधव यांनी दिली होती.
अनुराधासह राज शेख आणि नरेश गायकवाड या दोघांनाही पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. अनुराधा आणि तिच्या दोन साथीदारांना २४ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनुराधानं अनेकांना फसवल्याचा संशय आहे. त्याबद्दल पोलीस आणखी तपास करत आहेत.
दरम्यान, अनुराधा कशेळकर या युवा सेनेच्या स्थापनेबासून आजपर्य़ंत तीन वर्षांत कोणत्याही पदावर नव्हत्या. त्यांचा युवा सेनेशी काहीही संबंध नाही. त्या गेल्या तीन वर्षांत युवा सेनेच्या सक्रिय सदस्यदेखील जालेल्या नाहीत याची नोंद संबंधितांनी घ्यावी. तसेच त्या कोणत्याही प्रकरणात दोषी असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे युवा सेनेने शिवसेना भवन येथून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे खुलासा केला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.