www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आज अंगारकी चतुर्थी...त्यामुळं आज गणेशभक्तांनी गणेशदर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्यात. मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात गणेशभक्तांनी रात्रीपासूनच रांगा लावल्यात.
मुद्गल पुराण तसंच गणेश पुराण या ग्रंथांत दिलेल्या कथेनुसार ‘अंगारक’ या भारद्वाज ऋषी पुत्रानं कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतलं. त्यावेळी गणपतीनं त्याला वरदान दिलं की तुझं नाव ‘अंगारक’ हे लोकस्मरणात सदैव राहील. तो दिवस चतुर्थीचा होता म्हणून या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्यास कोणतंही संकट येत नाही.
घ्या सिद्धीविनायकाचं दर्शन
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.