घाटकोपर रेल्वे स्टेशनवर परदेशी महिलेचा विनयभंग सीसीटी कॅमेऱ्यात कैद

दोन दिवसांपूर्वी घाटकोपर रेल्वे स्थानकावर एका परदेशी महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. त्या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज झी मीडीयाच्या हाती लागलंय.

Updated: Mar 20, 2015, 10:59 AM IST
घाटकोपर रेल्वे स्टेशनवर परदेशी महिलेचा विनयभंग सीसीटी कॅमेऱ्यात कैद title=

मुंबई : दोन दिवसांपूर्वी घाटकोपर रेल्वे स्थानकावर एका परदेशी महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. त्या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज झी मीडीयाच्या हाती लागलंय.

या सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत असलेली काळ्या कपड्यातील परदेशी महिला घाटकोपर रेल्वे स्थानकांवरील प्लेटफार्म नंबर ४ वरुन जात असताना प्लेट फार्मवर एक तरुण बसला होता. समोरुन एक लोकल ट्रेन येताच त्या तरुणाने धावत जाऊन ट्रेन पकडली आणि समोरुन येत असलेल्या परदेशी महिलेशी अतिशय असभ्य असं वर्तन केले.

ट्रेन प्लेटफार्म वरुन सुटताच एक पांढ-या रंगाचा शर्ट घातलेला मुलगा धावत गाडी पकडतो आणि त्या परदेशी महिलेशी घृणास्पद कृत्य करतो. हे पाहून प्लेटफार्मवरील इतर महिला प्रवाशांच्या मनात ही लज्ज निर्माण झाली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, रेल्वे पोलीस देशाचं नाव खराब करणा-या तरुणाचा शोध घेत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.