मुंबई : मुंबईतील अंधेरीचा राजाच्या प्रवेशद्वारासाठी तब्बल ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काँग्रेस नगरसेविका शितल म्हात्रेंनी हा आरोप केला आहेत. मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय खुद्द महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांकडूनच गैरवापर होताना दिसत आहे.
अंधेरीच्या राजाच्या प्रवेशद्वारासाठी गेल्या वर्षीही १५ लाखांची तरतूद केली होती. पण मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा अधिकार यशोधर फणसे यांना दिला कोणी? असा सवाल उपस्थित होत आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष आणि अंधेरीचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केवळ मंडळाच्या प्रवेशद्वाराठी ५० लाख रुपयांची तरतूद करुन घेतली आहे. मुंबईकरांच्या करातून जमा होणाऱ्या रक्कमेतील मोठा वाटा लोकप्रतिनिधी वैयक्तिक संस्था आणि मंडळांना वापरताना दिसत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.