अमित आणि उर्वशी राज ठाकरेंचे सोशल अकाऊंटस वादात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित आणि मुलगी उर्वशी यांचे ट्विटर अकाऊंट जोरात टिव टिव करताना दिसतेय... अनेक वादग्रस्त ट्विटस् या अकाऊंटवरून केले गेलेत... याच बद्दल अमित आणि उर्वशी यांनी पोलीस स्टेशन गाठलंय. 

Updated: Nov 18, 2014, 07:10 PM IST
अमित आणि उर्वशी राज ठाकरेंचे सोशल अकाऊंटस वादात title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित आणि मुलगी उर्वशी यांचे ट्विटर अकाऊंट जोरात टिव टिव करताना दिसतेय... अनेक वादग्रस्त ट्विटस् या अकाऊंटवरून केले गेलेत... याच बद्दल अमित आणि उर्वशी यांनी पोलीस स्टेशन गाठलंय. 

फेसबुक आणि ट्विटर या सोशल वेबसाईटवर अमित आणि उर्वशी राज ठाकरे या दोघांच्याही नावाने फेक अकाऊंट तयार करण्यात आलेत. या अकाऊंटचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकारही होताना दिसतोय.

हा प्रकार डिसेंबर २०१२ मध्ये उघडकीस आला होता. त्यावेळी, त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. पण, त्यानंतर अजूनपर्यंत या फेक अकाऊंटपर्यंतचा निकाल लागू शकलेला नाही... शिवाय यावर वादग्रस्त ट्विटस् सुरूच आहेत. त्यामुळे आता या दोघांनीही मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे धाव घेतलीय. 


उर्वशीनं पोलिसांनी दिलेलं पत्र

तसंच, आपलं फेसबुक किंवा ट्विटरवर कोणत्याही प्रकारचं सोशल अकाऊंट नसल्याचं अमित आणि उर्वशी यांनी स्पष्ट केलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.