मुंबई: पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्यानं मुंबईच्या डबेवाल्यांची सेवाही विस्कळीत झाली आहे. प्रत्येक स्टेशनला उसळलेली गर्दी आणी उशीरानं धावणाऱ्या लोकल या पार्श्वभूमिवर डबेवाल्यांची साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
आणखी वाचा - LIVE UPDATE- पश्चिम रेल्वेची वाहतूक रूळावर, पण वेळापत्रक कोलमडलं
त्यामुळं आज पश्चिम उपनगरातून येणारे, पश्चिम उपनगरात जाणारे डबे आणि त्याच्याशी निगडित विभागातील डबे पोचवण्याचा व्यवसाय बंद ठेवण्यात आलाय. मुंबई डबेबाला असोसिएशननं ही माहिती दिलीय.
काम पूर्ण पण वाहतूक विस्कळीत
दरम्यान २२ तासांच्या खोळंब्यानंतर पश्चिम रेल्वेवरचं दुरुस्तीचं काम अखेर पूर्ण झालंय. ज्या रुळावर अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यान काल लोकलचे डबे घसरले होते, त्या रुळावरुन लोकल वाहतूक सुरु झाली आहे. मात्र, वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिरानं धावत आहे.
आणखी वाचा - पश्चिम रेल्वेच्या मदतीला 'बेस्ट' धावली
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.