बेहिशेबी मालमत्ता : गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी ही नोटीस बजवण्यात आली आहे.

Updated: Dec 6, 2016, 05:25 PM IST
बेहिशेबी मालमत्ता : गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस  title=

मुंबई : गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी ही नोटीस बजवण्यात आली आहे.

रणजीत पाटील यांनी मुलीच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार  विक्रांत काटे यांनी अकोला एसीबीला केली होती. या तक्रारीनंतर एसीबीने चौकशी करुन रणजित पाटील यांना क्लिन चीट दिली होती. 

एसीबीने दिलेल्या क्लिन चिटला काटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या आव्हानानंतर आज न्यायालयाने नोटीस बजावलीय. दोन वर्षापूर्वीच्या या प्रकरणाला एसीबी आणि रणजीत पाटील यांना उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.