'फडणवीसांचाही पृथ्वीराज चव्हाण होईल'

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा धडाका लावला आहे. 

Updated: Feb 6, 2017, 09:45 PM IST
'फडणवीसांचाही पृथ्वीराज चव्हाण होईल' title=

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा धडाका लावला आहे. चांदिवलीच्या सभेमध्येही उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना संपणार असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. पृथ्वीराज चव्हाण यांची आज जी हालत आहे तीच अवस्था या मुख्यमंत्र्यांची होणार आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- मुंबईत नरेंद्र मोदींची सभा झाली पाहिजे, त्यांची सभा होऊनही शिवसेना कशी जिंकते हे त्यांना दिसेल

- मुंबईच्या व्यथा जेवढ्या मला माहिती आहेत तेवढ्या बाहेरून येऊन प्रचार करणाऱ्यांना माहिती नसणार

- सरकार चालवताना आमचा टेकू लागतो, आता मुंबईही तुम्हाला हवी मग आम्ही काय तुमची धुणी भांडी करायची का?

- मुख्यमंत्री विधान सभेत एक बोलतात आणि सभेत दुसरं बोलतात, मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणला पाहिजे

- मगरुरीनं वागणाऱ्यांचा या देशात पराभव झाला आहे, इंदिरा गांधींचाही झाला होता

- राम मंदिराची शिवसेनेला आज आठवण झाली आहे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे

- इथे सरकार असून सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज माफी देत नाहीत आणि उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याच्या घोषणा देतात