समुद्र किनाऱ्याची मजा लुटा, पण सुरक्षा नियमांचं पालन करा

यंदाच्या पावसाळ्यात 21 दिवस हायटाईडचा धोडा मुंबई हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबई महापालिकेनं हायटाईडच्या दिवसांची यादी जारी केलीय. 13 जून ते सप्टेंबर 12 या कालावधीत अरबी समुद्रात 4.5 मीटरच्या लाटा उसळतील असं मुंबई महापालिकेनं म्हटलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 13, 2014, 08:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यंदाच्या पावसाळ्यात 21 दिवस हायटाईडचा धोडा मुंबई हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबई महापालिकेनं हायटाईडच्या दिवसांची यादी जारी केलीय. 13 जून ते सप्टेंबर 12 या कालावधीत अरबी समुद्रात 4.5 मीटरच्या लाटा उसळतील असं मुंबई महापालिकेनं म्हटलंय. सोबतच मुंबईकरांनो समुद्र किनाऱ्याची मजा लुटा, पण सुरक्षा नियमांचं पालन करा असं महापालिकेकडून सांगण्यात आलंय.

मुंबई महापालिकेनं तशी सूचना जाहीर केलीय. भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्यात जावू नये. भरती ओसल्यानंतरही 3-4 तास त्याचं पालन करावं, अशा सूचना महापालिकेनं केल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.