कोर्टाच्या आदेशानंतरही नाही उघडणार डान्सबार

फाईव्ह स्टारमधील डान्सबार बंद होण्याची शक्यताय. फाईव्ह स्टार आणि डान्सबारमधील फरक लवकर मिटवू, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 22, 2013, 05:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फाईव्ह स्टारमधील डान्सबार बंद होण्याची शक्यताय. फाईव्ह स्टार आणि डान्सबारमधील फरक लवकर मिटवू, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिली.
याबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन धोरण निश्चित केलं जाणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी विधानसभेत दिलीये. मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात मागणी केली केली होती. त्यावर उत्तर देताना आर.आर. पाटील यांनी ही माहिती दिली.
राज्य सरकारच्या घेतलेल्या निर्णयावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाने म्हटले होते, की फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये डान्स सुरू आहे. परंतु, डान्स बारमध्ये बारबालांना डान्स करण्यास मनाई का. सरकारचे धोरण भेदभावपूर्ण असल्याचेही आपल्या निकाल म्हटले होते.
कोर्टाच्या या निकालानंतर राज्यातील डान्सबार सुरू होण्याची शक्यता होती. मात्र, फाईव्ह स्टार हॉटेलमधीलही डान्सबार बंद करण्याबाबत सरकारने भूमिका घेऊन डान्सबार सुरू करण्याला तीव्र विरोध दर्शविला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.