www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अरबी सागरात मुंबईहून दक्षिण-पश्चिम भागात जवळपास 660 किलोमीटर अंतरावर निम्न दाबानं ‘नानौक’ नावाचं चक्रिवादळ निर्माण व्हायला गती मिळालीय. हे चक्रिवादळ ओमानच्या तटाकडे पुढे सरकतंय.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पहाटे 5.30 च्या सुमारास जोरात हवा सुटली. ही हवा अरबी सागराच्या पूर्व मध्यातून गतीशील होत होती. येत्या 24 तासांत नानौक या चक्रिवादळामुळे आणखी जोरात हवा सुटू शकते आणि येत्या 72 तासांच्या दरम्यान पश्चिम-उत्तर पश्चिममध्ये ओमान तटाकडे ही हवा पुढे सरकण्याची शक्यता आहे.
त्यामुळे, गुजरात आणि कोकण किनारपट्टीभागात 55 किमी प्रती तासाच्या वेगानं हवा सुटण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. त्यामुळे, मच्छिमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याची चेतावणी हवामान खात्यानं दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.