www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राष्ट्रीय पक्षांना माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याचा निर्णयावर काँग्रेसनं तिखट प्रतिक्रिया दिलीय. माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेत राजकीय पक्षांचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय माहिती आयुक्तलयानं नुकताच दिला होता. त्यावर काँग्रेसनं आपली नाराजी व्यक्त केलीय.
पक्षाला आयोगाचा हा निर्णय मान्य नसल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. ‘मुख्य माहिती आयुक्तांचा हा दृष्टीकोन म्हणजे लोकशाहीवर घाला’ असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी केलीय. अशाप्रकारच्या निर्णयामुळं लोकशाही संस्थांच्या अधिकारांची पायमल्ली होणार असून काँग्रेसला हा निर्णय मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर भाजपनं मात्र सावध पवित्रा घेत पक्षाची भूमिका अजून ठरायची असल्याचं भाजपचे महासचिव राजीवप्रताप रूडी यांनी सांगितलंय.
माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेत राजकीय पक्षांचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय काल केंद्रीय माहिती आयुक्तलयानं घेतलाय. यामुळे राजकीय पक्षांच्या उधळपट्टीलाही यामुळे लगाम लागणार आहे. यापुढे प्रत्येक खर्चाचा तपशील ठेवणं आणी तो जनतेनं सादर करण्यास सांगितलं तर तो सादर करणं राजकीय पक्षांसाठी बंधनकारक राहणार आहे. यानिर्णयामुळे जनता डायरेक्ट राजकीय पक्षांना प्रश्न विचारू शकते. पण, काँग्रेसनं मात्र हा लोकशाहीवरचा घाला असल्याचं म्हटलंय. आरटीआय कार्यकर्त्यांनी मात्र प्रादेशिक पक्षांनाही माहिती अधिकारात आणण्याची मागणी केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.