मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांची पुन्हा नाराज झाले आहेत. याआधीही कामत यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढली होती.
दरम्यान, आगामी निवडणुकीत त्यांना दूर लोटल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कामत हे पुन्हा नाराज झाले आहेत. त्यांनी स्वतः पालिकेच्या निवडणुकीत उमेदवार निवड आणि प्रचारापासून अलिप्त रहाण्याचा निर्णय घेतलाय आहे.
गुरुदास कामत यांचा समर्थकांना मॅसेज पाठवून हा निर्णय जाहीर केला आहे. या मेसेजमध्ये मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर टीका करण्यात आली आहे.