राष्ट्रवादीच्या पाठोपाठ काँग्रेसमध्येही बदल होणार- सूत्र

`झी मीडिया`च्या सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि पाणीपुवरठा व स्वच्छता राज्यमंत्री रणजीत कांबळे यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 8, 2013, 01:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादीच्या पाठोपाठ आता काँग्रेसमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. `झी मीडिया`च्या सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि पाणीपुवरठा व स्वच्छता राज्यमंत्री रणजीत कांबळे यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याकडं काँग्रेसचं लक्ष असून त्यानुसार काँग्रेसही आपल्या प्रदेशाध्यक्षांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंचा लवकरच मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि लातूरचे आमदार अमित देशमुख यांचाही नव्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.