मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईचा दौरा करत नालेसफाईची पाहणी केली. यावर भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
आशिष शेलार यांनी उद्धव यांच्यानंतर नालेसफाई दौरा केला. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ज्या गोष्टींची भीती आहे त्या गोष्टी पुन्हा होत आहेत. डम्पिंग ग्राउंड - नालेसफाई - कंत्राटदार - गाळ मोजणारा काटा यावर लक्ष द्या, असे पालिकेला आधीच सांगितले होते. आज प्रत्यक्ष प्रवास केला असता यामधील त्रुटी पुन्हा उघड झाल्याचे शेलार म्हणालेत.
नालेसफाईबाबत आम्ही 100 टक्के असमाधानी आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दौराबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केलेय. हा दौरा म्हणजे कंत्रातदारांना क्लीनचिट दिलेला हा प्रवास झाला. कालचा प्रवास मुंबईकरांचा हिताचा नसून कंत्राटदारांना क्लीनचिट देणारा होता, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.
मुंबईत 100 टक्के नालेसफाई होऊ शकत नाही, असे जे बोलतात ते करुन दाखवतात, असे म्हणत जे बोलतो ते करतो म्हणणारे करू शकत नाही हे जनतेसमोर बोलत आहेत हे दुर्देवी आहे. स्वतःची जवाबदारी जवाबदारीच्या पदावर बसलेले हे झटकू शकत नाही, भाजप हे मान्य करणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंना त्यांनी टार्गेट केले.
त्याचवेळी मुंबईच्या महापौरांचाही समाचार घेतला. सलमान खान शौचालय हटवण्यात येणार असेल तर मी महापौरचा निषेध करतो, हे एका अभिनेत्याच्या बाजूने आहेत. ते सर्वसामान्यांचे नाही, अशी टाकी शेलार यांनी केली.
पेंग्विन प्रकरणावर बोलताना ते म्हणालेत, राणीच्या बागेतील फी अवास्तव वाढवलेल्या आहेत. सामान्य माणसाच्या गोष्टी करायच्या आणि पैसे वाढवायचे याचा भाजप निषेध करतो, असे शेलार म्हणालेत.