www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात मुंबईसह पुणे, जळगावमध्ये थंडीची चाहूल आहे. पुण्यात थंडीचा मुक्काम वाढला आहे. तर जळगावात सध्या ११ डिग्री सेल्सिउस तापमानाची नोंद करण्यात आलीय. मुंबईत सकाळी चांगलाच गारवा आहे.
थंडीचा मुक्काम वाढल्याने पुणेकर सध्या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. पुण्यात आज सकाळी ११ डिग्री सेल्सीयस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात पारा १० ते १२ डिग्री सेल्सीयसच्या आसपास घुटमळतो आहे. बंगालच्या उपसागरात कमी दॅबाचा पट्टा निर्माण झल्याने, उत्तरेकडून थंड वार महाराष्ट्राच्या दिशेने वाहत होते. त्यामुळे राज्यातील पारा खाली गेला आहे. ही स्थिती तीन दिवस राहील. असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला होता. मात्र आठ दिवसानंतरही अजुन पारा काही चढलेला नाही. त्यामुळे पुणेकर सध्या गुलाबी थंडीची मजा घेत आहेत.
तर जळगावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी थंडीचा पाराही घसरलाय. जळगावात सध्या ११ डिग्री सेल्सिउस तापमानाची नोंद करण्यात आलीय. यावर्षीच हे नीचांकी तापमान मानलं जातंय. नोव्हंबर महिन्यातच थंडीची ही परिस्तिति आहे अजून थंडीचे दोन महिने काढायचे असल्याने नागरिक आतापासून धास्तावले आहेत.
सध्या तापमानाचा पारा घसरल्याने सकाळी बाहेर पडताना उबदार कापडांचा सहारा नागरिकांना घ्यावा लागतोय. तसेच जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.