मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस 'जय गंगाजल' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करतायत.
प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी 'जय गंगाजल' या चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केलंय. अमृता फडणवीस पेशाने बँकर आहेत. सध्या अॅक्सिस बँकेत त्या असोसिएट उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. मात्र त्यांना गाण्याचीही आवड आहे.
'जय गंगाजल'मधील सब धन मति हे गाणं त्यांनी गायलंय. याआधी अमृता फडणवीस मराठी चित्रपटातही गायल्या आहेत.
जेव्हा मी अमृता फडणवीस यांचा आवाज ऐकला तेव्हा जय धन मति या गाण्यासाठी त्यांचा आवाज परफेक्ट वाटला, असे प्रकाश झाल यांनी सांगितले. अमृता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असूनही सामान्यांसारखे जीवन जगतात असेही त्याने यावेळी आवर्जून सांगितले.