मुंबई : राज्यात १४ जिल्ह्यात तर देशात १६१ जिल्ह्यात मुलींची संख्या वेगाने घटली आहे. महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सुधारण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
राज्यात बीड, जालना, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, वाशीम, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर, आणि पुणे या जिल्ह्यांत मुलींचा दर सरासरीपेक्षा कमी नोंदवला गेला होता. तसेच या पाठोपाठ हिंगोली, नाशिक, परभणी आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्येही मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.