मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास पुण्याच्या दिशेनं निघालेल्या दुरंतो एक्सप्रेसचा पेंटाग्राफ कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान तुटला. यामुळे कल्याण ते अंबरनाथ वाहतूक ठप्प झाली होती.

Updated: Sep 15, 2015, 11:17 AM IST
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास पुण्याच्या दिशेनं निघालेल्या दुरंतो एक्सप्रेसचा पेंटाग्राफ कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान तुटला. यामुळे कल्याण ते अंबरनाथ वाहतूक ठप्प झाली होती.

अधिक वाचा : ट्रॅकवरून लोकलचा डब्बा घसरल्यानं हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प

पेंटाग्राफ तुटल्याने मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात. तर काही गाड्यांची वाहतूक उशिरानं होत होती.  यामुळे कल्याण-डोंबिवली आणि ठाणे स्थानकांमध्ये अनेक प्रवाशांचा ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाला होता.

सकाळी वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेकांना आपल्या कार्यलयीन वेळेत पोहोचता आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.