अबब! मुख्यमंत्री कार्यालयातील फॉल सिलिंग कोसळलं, चौकशीचे आदेश

सध्याचं बांधकाम आणि होणारे अपघात काही नवीन नसतात. पण रविवारी एक घटना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातच घडली. त्यामुळं हे बांधकाम कोणत्या दर्जाचं आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Updated: Sep 14, 2015, 10:03 PM IST
अबब! मुख्यमंत्री कार्यालयातील फॉल सिलिंग कोसळलं, चौकशीचे आदेश title=

मुंबई: सध्याचं बांधकाम आणि होणारे अपघात काही नवीन नसतात. पण रविवारी एक घटना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातच घडली. त्यामुळं हे बांधकाम कोणत्या दर्जाचं आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

आणखी वाचा - दुष्काळग्रस्तांसाठी अजिंक्य आला धावून, ५ लाखांची मदत

मुख्यमंत्र्यांच्या दालनातील नव्यानंच बांधण्यात आलेलं ५० फूट फॉल सिलिंग कोसळलं. सुदैवानं ही घटना रात्री घडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची लगेच दखल घेत या बांधकामाच्या चौकशीचे आदेश बांधकाम विभागाच्या सचिवांना दिलीय. मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर हे बांधकाम करण्यात आलं होतं.

आणखी वाचा - ...आणि सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच भाजप बॅकफूटवर!

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.