मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन अप धिम्या मार्गावरील रुळाला तडे गेल्याने सकाळी कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उशीराने धावत आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. 

Updated: Jan 19, 2016, 11:23 AM IST
मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन अप धिम्या मार्गावरील रुळाला तडे गेल्याने सकाळी कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उशीराने धावत आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. 

दरम्यान रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत, रेल्वे रूळ दुरूस्तीचे काम सुरू आहे, थोड्याच वेळात लोकल वाहतूक पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.या बिघाडामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.