'मरे'- मेगाब्लॉक संपला, पण प्रवाशांचे हाल सुरूच

मध्य रेल्वेचा डीसी टू एसी परिवर्तनाचा विशेष ब्लॉक संपला असला तरी लोकल सेवा अद्याप विस्कळीत असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या काही लोकल १० ते १५ मिनिटं उशीरानं धावत असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

Updated: Jun 8, 2015, 05:08 PM IST
'मरे'- मेगाब्लॉक संपला, पण प्रवाशांचे हाल सुरूच title=

मुंबई: मध्य रेल्वेचा डीसी टू एसी परिवर्तनाचा विशेष ब्लॉक संपला असला तरी लोकल सेवा अद्याप विस्कळीत असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या काही लोकल १० ते १५ मिनिटं उशीरानं धावत असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्लॉकमुळे लोकल सेवा विस्कळीत असेल याची पूर्वकल्पना लोकांना देण्यात आली होती, मात्र ऐन गर्दीच्या वेळेस लोकल उशीरानं धावत असल्यानं अनेक स्थानकांवर मोठी गर्दी जमली आहे. 
 
दरम्यान, लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईहून पुण्याला जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई भुसावळ एक्सप्रेस ही लांब पल्ल्याची गाडीही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं प्रवाशांची होणारी गैरसोय आजही सुरूच राहण्याची चिन्ह आहेत.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.