मुंबई : माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' करून भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागठाणे विधानसभा मतदार संघात पक्षाच्या ढसाळलेल्या बुरुजाची पुन्हा नव्याने डागडूजी करण्यास सुरुवात केली.
या मतदार संघातील पक्षाची एक-दोन नव्हे तर तब्बल सात जनसंपर्क कार्यालयांची उदघाटन ठाकरे यानी आज केली. निवडणुकीतील अपयशमुळे खचलेल्या कार्यकर्त्यांनाही मोठ्या कालावधीनंतर राज ठाकरे यांच्या प्रत्यक्ष दर्शनामुळे दिलासा आणि कामाची ऊर्जा मिळाली.
पण कार्यालय उद्घाटनांच्या या दौऱ्यात राज ठाकरे यानी प्रसारमाध्यमांशी बोलणे कटाक्षाने टाळले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.