मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या घरी सीबीआय अधिकाऱ्यांनी छापा टाकलाय. सेटलवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला.
मुंबईतील जुहू भागात असलेल्या तिस्ता सेटलवाड यांच्या घरावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी छापा टाकला. कागदपत्रांबाबत अद्याप काही खुलासा सीबीआयकडून करण्यात आलेला नाही. दरम्यान, तिस्ता सेटलवाड यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
सीबीआयने तिस्ता सेटलवाड तसेच त्यांच्या संस्थेविरोधात गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल केला होता. परदेशातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीबाबत त्यांच्या संस्थेने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून परवानगी घेण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.