मनसेचा दणका, पाकिस्तानी 'बिन रोये' महाराष्ट्रात नाही

Updated: Jul 14, 2015, 06:52 PM IST
 मनसेचा दणका, पाकिस्तानी 'बिन रोये' महाराष्ट्रात नाही title=

बीफ़ोरयू संस्थेचे मनसे चित्रपट सेनेला लेखी आश्वासन 

मुंबई : पाकिस्तानी चित्रपट 'बिन रोये' ला महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केलेल्या विरोधानंतर आता हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. 

या संदर्भातील एक पत्र बीफोरयू या संस्थेने मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना पाठवून लेखी आश्वासन दिले आहे.  विरोध करणारे एक लेखी निवेदन अमेय खोपकर यांनी बीफोरयूला दिले होते. 

अमेय खोपकर म्हणाले की,  आज महाराष्ट्रात आणि भारतात पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी कारवाया होत असून सीमेवर अनेक जवान पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात शहीद होत असताना पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करणे म्हणजे हि एक प्रकारची शोकांतिकाच म्हणावी लागेल.  

तसेच भारतीय कलाकारांना पाकिस्तानात काम करू न देणे अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट हे सहन करणार नाही आणि जर आपण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित केलाच तर मनसे स्टाइल ने जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला होता. 

या आवाहनाला प्रतिसाद देत बीफोरयू संस्थेने "बिन रोये" हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित करणार नाही असे लेखी आश्वासन दिले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.