भारतामुळे चीन-पाकिस्तानात या वस्तुचा खप वाढला

 इस्त्रोने एकाच वेळेस १०४ उपग्रह लॉन्च केले आणि जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 15, 2017, 05:57 PM IST
भारतामुळे चीन-पाकिस्तानात या वस्तुचा खप वाढला title=

मुंबई : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने एक नवीन रेकॉर्ड केला, इस्त्रोने एकाच वेळेस १०४ उपग्रह लॉन्च केले आणि जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

यावर सोशल मीडियावर फिरकी घेण्यात येत आहे, इस्त्रोने हे प्रक्षेपण केल्यानंतर चीन आणि पाकिस्तानात बर्नोलचा खप वाढलाय, असा चिमटा चीन आणि पाकिस्तानला काढण्यात आला आहे.

बर्नोल ही क्रीम जळण्यावर वापरली जाते, तेव्हा पाकिस्तान आणि चीन भारताच्या या यशावर जळत असल्याचं बर्नोलच्या जोकवरून सांगण्याचा प्रयत्न आहे.

भारताने १०४ उपग्रह लॉन्च केल्यानंतर चीन आणि पाकिस्तानात बर्नालचा खप वाढण्याचं सांगण्यात येत आहे.

इस्त्रोने  या आधी एका अभियानात २० उपग्रहाचं प्रक्षेपण केलं होतं, या आधी एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह पाठवण्याचा रेकॉर्ड रशियाच्या नावावर होता. रशियाने २०१४ मध्ये एकाच वेळी ३७ उपग्रह लॉन्च केले होते.